Rocky aur Rani ki Premkhani मध्ये दिसणार या चित्रपटाचा टीझर; प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज

Rocky aur Rani ki Premkhani Dono Teaser Release : अवनीश एस बडजात्या यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या दोनों या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. हा चित्रपट खास आहे कारणया चित्रपटातून दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. तर दुसरीकडे पलोमा आणि राजवीर देओल या दोघांचं देखील या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. (Dono Teaser Release in Rocky aur Rani ki Premkhani )

या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून तो आता आलिया भट आणि रणवीर सिंगच्या रॉकी और रानी की प्रेमकाहनी या चित्रपटाला जोडला आहे. त्यामुळे रॉकी और रानी की प्रेमकाहनी हा चित्रपट पाहायाला गेल्यावर प्रेक्षकांनी आणखी एक मेजवानी मिळणार आहे. कारण त्यात पलोमा आणि राजवीर देओल या दोघांच्या दोनों या चित्रपटाचा टीझर असणार आहे.

राजवीर देओल हा प्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांचा मुलगा आहे. तर पलोमा ही ज्येष्ठ अभिनेत्री पुनम धिल्लन यांची मुलगी आहे. या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी पसंत केलं आहे. तसेच या चित्रपटातून सूरज आर बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस बडजात्या देखील दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.

त्यामुळे आता या खास पदार्पणाच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट डेस्टिनेशन वेडिंगच्या बॅकड्रॉपमध्ये घडलेली एक रोमॅंटीक प्रेमकथा आहे. राजश्री प्रोडक्शनच्या पारंपारिक चित्रपटांच्या यादीतच बसणारा हा एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे. त्यामुळे त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *