Akelli Teaser : नुसरत भरूचाच्या ‘अकेली’ चा अंगावर काट आणणाऱ्या टीझर रीलीज

Akelli Teaser : नुसरत भरूचाचा (Nushrratt Bharuccha) कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. तिने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावल्या आहेत. तर आता ती अशीच एक आगळीवेगळी भूमिका निभावत आहे. आगामी चित्रपट ‘अकेली’ (Akelli) या चित्रपटामध्ये मात्र ही भूमिका तिच्या आतपर्यंतच्या भूमिकांपेक्षा कठिण मानली जात आहे. या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. ( Nushrratt Bharuccha Akelli Movie Teaser Release )

यामध्ये ती एका वेगळ्याच संघर्षामध्ये सापडली आहे. हे पाहून तुम्हाला देखील भीती वाटल्या शिवाय राहणार नाही. या अंगावर काटा आणणाऱ्या टीझरवरून चित्रपटाचा अंदाज येत आहे. यामध्ये एका सामान्य मुलीची भूमिका करणारी नुसरत यात घाबरून गेल्याचं दिसून येत आहे. ती एका अशी जगात पोहचली आहे. जेथे अंधार, भयावह वातावरण आणि काही बंदुकधारी माणसं दिसत आहेत.

हा चित्रपट 18 ऑगस्टला रिलीज होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या टीझरमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रणय मेशराम यांनी केलं आहे. तर नुसरतसह यामध्ये निशांत दहिया देखील दिसणार आहे.

दरम्यान आतापर्यंत नुसरतने तिच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावल्या आहेत. तर आता ती अशीच एक आगळीवेगळी भूमिका निभावत आहे. प्यार का पंचनामापासून तिचा प्रत्येक चित्रपट तिच्या अभिनयाने अधिकच प्रभावशाली ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *