मतासाठी कोणतीही लाचारी पत्करू हे ठाकरेंनी तीन वर्षांपूर्वी सिद्ध केलं; विखेंची ठाकरेंवर टीका

Sujay Vikhe on Udhav Thackery : मुंबईमध्ये हिंदी भाषिक दिवस साजरा केला जात आहे. दरम्यान याच दिनाच्या अनुषंगाने नगर शहराचे खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना का सोडली? यावर देखील त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. (Sujay Vikhe Criticize Udhav Thackery for mahavaikas aaghadi )

काय म्हणाले खासदार सुजय विखे?

उद्धव ठाकरेंवर टीका करताना खासदार सुजय विखे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सत्तेसाठी आणि मतासाठी कोणतीही लाचारी पत्करावी लागली तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. हे त्यांनी तीन वर्षांपूर्वी सिद्ध केले म्हणून आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषिक मतदार त्या महानगरपालिकेत आहेत. ते बाजूला जाऊ नये यासाठी वारंवार आपली भूमिका सत्तेसाठी बदलणं हे उद्धव ठाकरे करत आहेत.

आपल्या विचारांशी तडजोड करणं मूळ हिंदुह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी बांधून दिलेल्या विचाराशी तडजोड करणे हे ज्या प्रक्रियेतून सुरू झालं आहे. तेच यापुढे देखील सुरू राहणार म्हणून पक्षावरील जी विश्वासार्हता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होती. ती विश्वासाहर्ता गमावल्यामुळेच एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. अशीच भूमिका इतरही जे त्या पक्षात राहिले आहे. तेही घेतील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहतील. अशी खासदार सुजय विखे यांनी यांच्यावर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *