मणिपूर हिंसाचारात परदेशी एजन्सींचा सहभाग; माजी लष्करप्रमुखांनी वर्तवली शक्यता

Manoj Narwane on Manipur violence : गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur violence) घटना घडत आहेत. त्यामुळे मणिपूरमधील सामाजिक जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. सामाजिक असंतोषाच्या या घटनांचे पडसाद देशभर उमटत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. याच पार्श्‍वभूमीवर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे (Manoj Narwane) यांनी आता मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात गंभीर शक्यता व्यक्त केली. नरवणे यांनी मणिपूर हिंसाचारात परदेशी एजन्सींचा सहभाग नाकारता येत नाही, असं विधान केलं. (Manoj Narwane on Manipur violence they said Involvement of foreign agencies in Manipur violence)

दिल्लीतील इंडियन इंटरनॅशनल सेंटरमध्ये राष्ट्रीय सुरक्षितता दृष्टीकोन या चर्चासत्रानंतर नरवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांनी त्यांनी सांगितलं की, मणिपूरमधील या सर्व हिंसात्मक घडामोडी घडत आहेत. मात्र, सध्या जे लोक सत्तेच्या पदावर बसून निर्णय घेत आहेत ते सर्वतोपरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत आहेत, असा माझा विश्वास आहे. मात्र, मणिपूरमधील हिंसाचारातील सर्व घटनांमध्ये परदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तर असं म्हणेन की, त्यांचा तिथे वावर आहेच. विशेषत: चीन अनेक वर्षांपासून कट्टर गटांना मदत करत आहे, यापुढे चीन मदत करेल, असं नरवणे यांनी सांगिलतं.

IND vs WI : सूर्यकुमार यादवऐवजी संजू सॅमसनला संधी दिली पाहिजे, कारण….

ते म्हणाले, अशा काही संघटना किंवा शक्ती असू शकतात ज्यांना मणिपूरमधील हिंसाचाराचा फायदा होणार आहे. त्यांना मणिपूरमधील परिस्थिती सामान्य व्हावी असे वाटत नाही. जितकी अशांतता असेल तितका फायदा त्यांना होईल. कदाचित त्यामुळेच खूप प्रयत्न करूनही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही. मात्र, सीमावर्ती राज्यांमधील ही अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी वाईट आहे.

मणिपूर का पेटलं?
मणिपूरमध्ये ३ मेपासून हिंसाचाराच्या घटना झपाट्याने सुरू झाल्या. मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडेंट्स युनियन ऑफ मणिपूरनं ३ मे रोजी मोर्चा काढला होता. मैतेई समाजाला अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला. मात्र, या मोर्चानंतर मणिपूरमध्ये सामाजिक संघर्ष निर्माण झाला. मोर्चाच्या दुसऱ्याच दिवशी दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, दोन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आले आहे. मणिपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात सीबीआयने आपल्या कार्यपद्धतीनुसार कारवाई सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *