Video : अन् अनिल कपूरच्या जर्मन चाहत्याने रस्त्यावर लावलं ‘राम लखन’ चं गाणं पाहा…

Anil Kapoor : हिंदीतील एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर म्हटलं की एक ना अनेक विशेषण त्यांचं कौतुक करायला कमी पडतात. त्यांचा दमदार अभिनय, तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा एनर्जेटीक डान्स, दिसणं, ते वयाने जरी जास्त असतील ते त्यांच्य दिसण्यात तीळमात्रही जाणवत नाही. त्यांचं काटेकोर लाईफस्टाईल त्यावरून दिसून येत. तसेच त्यांची चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. याचाच प्रत्यय आला तो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून काय आहे ही त्यांची ही इन्स्टाग्राम स्टोरी पाहूयात… (Anil Kapoor song from Ram Lakhan listened on Jarmany Munich road by fan )

काय आहे अनिल कपूर यांची इन्स्टाग्राम स्टोरी?

अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते रस्त्यावरील एका व्यक्तीशी बोलत आहेत. त्याने अनिल कपूर यांच्या राम लखन या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ए जी ओ जी आपल्या मोबाईल फोनवर लावलं. होतं तो ते ऐकत होता. त्यावेळी या अनिल कपूरच्या चाहत्याला थेट अनिल कपूर यांची भेट झाली आहे.

ही घटना जर्मनीतील म्युनिक शहरातील एका रस्त्यावर घडल्याचं अनिल कपूर यांनी सांगितलं. त्यांनी या चाहत्याला विचारलं की, हे गाणं कोणतं आहे? तेव्हा तो म्हणाला हे गाणं अनिल कपूर यांचं आहे. माझं भारतावर प्रेम आहे. तसेच या व्यक्तीचा पोशखही अनिल कपूर यांच्या राम लखन चित्रपटातील स्टाईलला मिळता जुळता होता. त्यामुळे अनिल कपूर पुढे म्हणतात … मेहनत से रोटी-रोजी कमाना.. हे आयकॉनिक गाणं आजही जागातील अनेक ठिकाणी लागू होतं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *