Manipur Violence : महिला विवस्त्र धिंड प्रकरण; सीबीआयने सूत्र हाती घेताच आरोपी वाढले

सीबीआयने मणिपूर हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड प्रकरणाची सुत्रे हाती घेताच आरोपी वाढले आहेत. सीबीआयने आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीबीआयकडून नवीन एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे.

जवळपास 88 दिवसांपासून मणिपुरात दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरु आहे. अद्यापही हा हिंसाचार थांबलेला नसून काही दिवसांपूर्वीच हिंसाराचारदरम्यान, दोन महिलांचा विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ काढण्यात आला होता. महिलांचा विवस्त्र धिंड काढण्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ हिंसाचारादरम्यानचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच एका पीडित महिलेचे वडिल आणि भावाने विरोध केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावरुन देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करण्यात आल्यानंततर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरत फटकारलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारसह राज्य सरकारने कारवाईचे निर्देश दिले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मंत्री अमित शाह यांच्याकडून दोन्ही समुदायातील प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत.

दरम्यान, मणिपूर सरकारने २६ जुलै पत्राच्या माध्यमातून पुढे चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपण्याची शिफारस केली आहे. गृह मंत्रालयाने २७ जुलै रोजी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. महिलेचा व्हिडिओ मे महिन्यातला असल्याचं सांगण्यात येतंय तर 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दखल घेतली.

गृह मंत्रालयाने सचिव अजय कुमार भल्ला यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये खटल्याची सुनावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातून प्रकरण सुनावणीसाठी मणिपूरच्या बाहेर ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *