धक्कादायक! 5 वर्षांत देशभरातून 2.75 लाख बालके बेपत्ता; गायब मुलींची संख्या 2 लाखांहून अधिक

दिल्ली : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आली त देशभरातील हरवलेल्या मुलांची आकडेवारी लोकसभेत जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत देशभरातून 2 लाख 75 हजारांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. या बेपत्ता मुलांमध्ये 2 लाख 12 हजार मुलींचा समावेश आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने गेल्या आठवड्यात लोकसभेत ही माहिती दिली. (In last five years more than 2 lakh 75 thousand children have gone missing across the country)

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 ते जून 2023 पर्यंत एकूण 2,75,125 मुले बेपत्ता झाली, त्यापैकी तब्बल 2,12,825 मुली आहेत. इराणी यांनी लोकसभेत बोलतांना सांगितले की, बेपत्ता मुलांपैकी 2 लाख, 40 हजार (2,40,502) मुलांचा शोध घेण्यात आला आहे. या शोध घेण्यात आलेल्या बेपत्ता बालकांमध्ये 1,73,786 (1.73 लाख) मुली होत्या.

भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? इंस्टाग्रामवरील बदलामुळे वाढली चर्चा

स्मृती इराणी यांनी लेखी उत्तरात सांगितले की, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारची चाइल्ड हेल्पलाइन देशभर काम करत आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ट्रॅक चाइल्ड पोर्टल देखील आहे.

मध्य प्रदेशातून सर्वाधिक मुले बेपत्ता झाली आहेत. मध्य प्रदेशात बेपत्ता मुलांची संख्या 61 हजारांहून अधिक आहे. बेपत्ता मुलांच्या बाबतीत पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यातील 49 हजारांहून अधिक मुले बेपत्ता आहेत. अहवालानुसार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि छत्तीसगड या सात राज्यांमध्ये सर्वाधिक मुले बेपत्ता होतात. या राज्यांमध्ये बेपत्ता मुलांची एकूण संख्या 2 लाख, 14 हजार, 664 आहे. म्हणजेच एकूण बेपत्ता मुलांपैकी 78 टक्के मुले या सात राज्यांतील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *