दिल्ली हादरली! लग्नाला नकार देणं विद्यार्थीनीला महागात पडलं, लोखंडी रॉडने…

मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत महिलांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका विद्यार्थिनीने लग्न करण्यासनकार दिल्याच्या कारणावरुन तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली हादरुन गेली असून राज्यातील महिला सुरक्षित कधी राहणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

घटनेत मृत्यू पावलेल्या विद्यार्थीनीचं नाव नर्गिस असं असून दिल्ल्लीच्या कमला नेहरु कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत होती. तिच्यात नात्यातला 28 वर्षीय मुलगा इरफानला तिच्यासोबत लग्न करायचं होतं.

इरफान हा स्विग्गी फुडमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करीत होता. त्याला नर्गिसशी लग्न करायचं होतं. पण नर्गिसच्या कुटुंबाने इरफानसोबत लग्नाला नकार दिला होता. इरफानला चांगली नोकरी नसल्याने त्याला नकार दिला होता.

नर्गिसने अचानक आपल्याशी बोलणं केल्याचा राग इरफानच्य मनात होता. त्यामुळे तो नाराज होता. नर्गिस दररोज मालवीय नगरमध्ये क्लासला जात असत. याची इरफानला माहिती होती. त्यामुळे त्याने रस्त्यातच नर्गिसला गाठत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, नर्गिसने इरफानशी बोलण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने सोबत असलेला लोखंडी रॉडच इरफानने नर्गिसच्या डोक्यात घातला.

या घटनेत नर्गिसला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. इरफान नर्गिसला गेल्या तीन दिवसांपासून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी आरोपी इरफानला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *