गदर 2 चं महाभारताशी आहे खास कनेक्शन; दिग्दर्शकांनी केला खुलासा…

Gadar २ : सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर २’ सिनेमाचा ट्रेलर बुधवारी 26 जुलैला लॉन्च करण्यात आला आहे. ‘गदर २’ च्या निमित्ताने चाहत्यांना 22 वर्षांनी पुन्हा एकदा तारा सिंग (Tara Singh) आणि सकिनाची (Sakina) जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ( Gadar 2 special connection with Mahabharat said Director Anil Sharma)

या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान आता चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी या चित्रपटाबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले की, या चित्रपटाची प्रेरणा त्यांना महाभारत आणि रामायणातून मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटाचं महाभारत आणि रामायणाशी खास कनेक्शन आहे काया आहे हे कनेक्शन? पाहूयात…

गदर नंतर गदर 2 मध्ये देखाल सनी देओलचे अॅक्शल सीन्स आहेत. त्यामुळे त्याला विचारण्यात आलं की, यामध्ये सनी आणि उत्कर्ष महाभारतातील युद्धासारखे कृष्ण आणि अर्जुनाप्रमाणे मैदानावर दिसले आहेत. ज्याप्रमाणे महाभारताचं युद्ध अर्जुनाने कृष्णाच्या मार्गदर्शनाने लढलं होतं. त्यामुळे ही चित्रपट महाभारतातून प्रेरणा घेऊन केला आहे का?

यावर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले की, हो, चित्रपट महाभारतातून प्रेरणा घेऊन केला आहे. कारण कथा मी रामायण, महाभारतातूनच घेत असतो. गदर देखील रामायणाप्रमाणे राम सीतेला आणायाला लंकेला आले होते. तर तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा ते रिलेच कराल. असं ही यावेळ शर्मा म्हणाले.

दरम्यान ट्रेलर लॉन्चच्या भव्य कार्यक्रमाला सनी देओल आणि अमीषा (Ameesha Patel) हे दोघे देखील अनोख्या पद्धतीने ट्रकमधून एन्ट्री मारली. त्या दरम्यान सिनेमाचा हटके ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सनी देओल काहीसा भावुक झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *