‘अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत पण’… शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ!

Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे आमदार यांनी पटेल यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे.

शिरसाट यांनी सारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर शिरसाट म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल, अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील. भविष्यात अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत पण, 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. भविष्यात म्हणजे 5 ते 10 वर्षांनंतरही अजित पवार मुख्यमंत्री होतील. ते आता कसे सांगता येईल.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी अजितदादा गटातील आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात अजितदादा भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले. त्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. विरोधकांकडूनही त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.

पटेल काय म्हणाले?

आज जर मुख्यमंत्रिपदाची जागा खाली नसेल तर त्याबद्दल चर्चा कशाला करता. आज अजितदादा महाराष्ट्राचे नक्कीच वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत आहेत. असं आहे की, कधी न कधी आज जरी नाही तर उद्या नक्कीच त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, असं असलं तरी आज ती जागा रिकामी नाही तर मग त्यावर चर्चा कशासाठी करत आहात? असा सवाल पटेल यांनी उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *