IND vs WI 1st ODI : भारत-वेस्ट इंडिज आज भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् रेकॉर्ड्स

  • Kensington Oval Stats, Record And Pitch Report * : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आजपासून (दि.27) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यातील पहिला सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताने यजमान वेस्ट इंडिजचा 1-0 असा पराभव केला होता. पहिल्या सामन्यापूर्वी केन्सिंग्टन ओव्हल मैदानाचा पिच रिपोर्ट आणि रेकॉर्ड्स नेमके काय हे जाणून घेऊया.

केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये चौथ्यांदा सामना होणार आहे. यापूर्वी केन्सिंग्टन ओव्हलवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाने या मैदानावर 2 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने केवळ 1 सामना जिंकला आहे.

काय सांगते खेळपट्टी

पूर्वी या मैदानावर धावा काढणे सोपे नव्हते, पण आता हे मैदान फलंदाजीला अनुकूल झाले असून, येथे 300 धावांचा डोंगर उभा करणे सहज शक्य आहे. 2022 मध्ये या मैदानावर न्यूझीलंडने 303 धावांचे आव्हान ठेवले होते. वेगवान गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी अनुकूल आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडणं फायदेशीर ठरू शकते.

केन्सिंग्टन ओव्हलचे एकदिवसीय आकडे नेमके कसे

केन्सिंग्टन ओव्हलवर आतापर्यंत एकूण 45 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने 17, पाहुण्या संघाने 22 आणि न्यूट्रल संघाने 5 सामने जिंकले आहेत. तर, एक सामना अनिर्णित राहिला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 19 सामने जिंकले आहेत. तर, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी 25 सामने जिंकले आहेत. 2019 मध्ये इंग्लंडने 48.4 षटकांत 364 धावा केल्या होत्या.

2007 मध्ये या मैदानावर आयर्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी 91 धावा केल्या होत्या. तर, पाकिस्तान संघाने 2000 मध्ये येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 197/8 अशी सर्वात कमी धावसंख्या केली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने 2007 मध्ये श्रीलंकेविरुद्ध येथे सर्वाधिक 149 धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेच्या अँड्र्यू हॉलने 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध 5/18 अशी सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. ख्रिस गेलने येथे 13 डावात सर्वाधिक 688 धावा केल्या आहेत. तर, ख्रिस गेल, ब्रायन लारा, डेसमंड हेन्स आणि जो रूट यांनी मैदानावर सर्वाधिक 2-2 शतके झळकावली आहेत.

वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफने 9 डावात सर्वाधिक 23 विकेट घेतल्या आहेत. ख्रिस गेलने सर्वाधिक 37 षटकार तर ब्रायन लाराने सर्वाधिक 59 चौकार मारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *