Goregaon: गोरेगावच्या फिल्मसिटीत घुसला बिबट्या, Video Viral

  • Leopard in Goregaon Film City* : सध्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये (Goregaon Filmcity) बिबट्याचा धुमाकूळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिसरात बिबट्याची दहशत कायमच सुरु आहे. (Leopard in Goregaon Film City) या परिसरात बिबट्या सर्रास फिरत असल्याचे आढळतात. (All Indian Cine Workers Association) या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आता पुन्हा एकदा बिबट्याने मुंबईतील फिल्मसिटीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी एका टीव्ही मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान बिबट्या दिसला आहे. हे पाहताच सर्वजण घाबरले आणि सेटवर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यचे दिसत आहे. गोरेगाव परिसरामध्ये असलेल्या फिल्मसिटीमध्ये एका मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरु असतानाच एक बिबट्या घुसल्याचे बघायला मिळाले आहे.

सध्या गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये बिबट्याची दहशत कायम निर्माण होत आहे. या भागात बिबट्या फिरत असल्याचे सतत दिसतो. बिबट्या कधी आणि कुठून येईल हे कोणीही सांगू शकत नाही. रात्री अपरात्री देखील या ठिकाणी शूटिंग होत असताना अशा घटना घडल्या आहेत. सेटवरील कलाकार आणि युनिटच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली जात आहे. ही बाब सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी सांगितले आहे. तर २०० लोकांचा जीव पुन्हा एकदा धोक्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. या अगोदर १८ जुलैला देखील मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये बिबट्या फिरत असताना आढळून आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *