Gadar 2च्या ट्रेलर लाँच वेळी सनी देओल भावुक; म्हणाला, दोन्ही देशातील लोक…

Gadar 2: सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर २’ सिनेमाचा ट्रेलर बुधवारी म्हणजेच काल लॉन्च करण्यात आला आहे. ‘गदर २’ च्या निमित्ताने चाहत्यांना  २२ वर्षांनी पुन्हा एकदा तारा सिंग (Tara Singh) आणि सकिनाची (Sakina) जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळालं आहे. ट्रेलर लॉन्चच्या भव्य कार्यक्रमाला सनी देओल आणि अमीषा (Ameesha Patel) हे दोघे देखील अनोख्या पद्धतीने ट्रकमधून एन्ट्री मारली आहे. त्या दरम्यान सिनेमाचा हटके ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सनी देओल काहीसा भावुक झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तब्बल २२ वर्षांनी ‘गदर’चा सीक्वेल येणे हा फक्त चाहत्यांसाठीच नाही तर सनी देओलसाठी देखील खूप खास क्षण असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळेच ट्रेलर लॉन्च कार्यक्रमामध्ये लोकांचे प्रेम बघून सनीला अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळालं आहे. सनी देओल रंगमंचावर आल्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात  जल्लोष करण्यास सुरु केले होते. अनेक पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सनी देओलला बघून “पाजी तुस्सी हमारी जान हो, हिंदुस्थान की शान…हिंदुस्तान झिंदाबाद” अशी घोषणाबाजी यावेळी देण्यात आल्या आहेत.

चाहत्यांचे प्रेम पाहून सनी देओल भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने उपस्थित सर्वांचे हात जोडून आभार मानले आहे. आपला सहकलाकार भावुक झाल्याचे बघताच अमीषा पटेलने त्याचे डोळे पुसल्याचे पाह्यला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी देखील सनी देओलचे कौतुक करत त्याला सिनेमासाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत.

‘गदर २’ मध्ये चाहत्यांना सनी देओलचे जबरदस्त संवाद आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे. सनी देओल यावेळी सकिनासाठी नव्हे तर मुलाच्या रक्षणासाठी पाकिस्तान गाठणार असलयाचे दिसत आहे. सिनेमात सिम्रत कौर, मनीष वाधवा यांसारखे काही नवे कलाकार बघायला मिळणार आहेत. या दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *