Amitabh Bachchan: महिलांच्या अंतर्वस्त्राबद्दल बिग बीं यांचं ‘ते’ ट्वीट चर्चेत; म्हणाले, ‘ब्रा आणि पँटी…’

  • Amitabh Bachchan* : चाहत्यांचे लाडके बिग बीं म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर (Social media) कायम काहींना काही विषयांवर पोस्ट शेअर करत असताना दिसून येत असतात. सध्या बिग बी हे त्यांच्या एका जुन्या ट्वीटमुळे (tweet) जोरदार चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. २०१० मध्ये बिग बींनी महिलांच्या अंतर्वस्त्रांबद्दल एक ट्वीट शेअर केले होते.

या ट्विटवर आता अनेक चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहेत. बिग बींच्या या जुन्या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. २०१० मध्ये बिग बीं यांनी महिलांच्या अंतर्वस्त्रांबद्दल एक ट्वीट केलं होते. या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले होते की, ‘इंग्रजी भाषेत ‘ब्रा’ एकवचनी आणि ‘पँटी’ अनेकवचनी का? असे बिग बीं यांच्या जुन्या ट्वीटचे अनेकांचे लक्ष वाढल्याचे बघायला मिळत आहे. या ट्वीटला सध्या अनेक चाहत्यांनी देखील भन्नाट रिप्लाय देत असल्याचे दिसत आहे.

एका चाहत्यांनी बिग बीं यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे. ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’ तर दुसऱ्या एका चाहत्यांनी लिहिले आहे की, ‘छान सवाल आहे बिग बीं साहेब, तुम्ही हा सवाल केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये विचारु शकता.’ बिग बीं यांना ट्विटरवर मिलियन फॉलोवर्स असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बी यांच्या ट्वीट्सला अनेक चाहत्यांची पसंती मिळत असते. बिग बीं हे ट्विटरवर कायम वेगवेगळे विषयांवर आधारित ट्वीट शेअर करत असतात.

बिग बीं यांच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता असते. बिग बीं यांचा ‘ऊंचाई’ हा हटके सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आल्याचे आपण पहिले आहात. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. आता बिग बीं हे केबीसीच्या नव्या सीझनमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. “कौन बनेगा करोडपती” या कार्यक्रमाचा १५ वा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *