Akshay Kumar: खिलाडीच्या ‘OMG 2’ सिनेमातील ‘हर हर महादेव’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

  • ‘OMG 2’ Song Har Har Mahadev* : चाहत्यांचा लाडका खिलाडी (Akshay Kumar) भाई म्हणजेच अक्षय कुमारच्या मोस्ट अवेटेड सिनेमा ‘OMG 2’ मधील ‘हर हर महादेव’ हे आणखी एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात खिलाडी भोलेनाथच्या अवतारामध्ये दिसत असून तो जबरदस्त डान्स करत आहे. हे गाणे शेखर अस्तित्व यांनी लिहिले असून, विक्रम मॉन्ट्रोज यांनी त्याचा आवाज आणि संगीत दिल्याचे सांगितले जात आहे. या गाण्याचे संगीत अप्रतिम असल्याचे दिसून येत आहे. (Har Har Mahadev Song) ‘हर हर महादेव’ या गाण्याची झलक बघायला मिळाली आहे. 

ओह माय गॉड 2’मधील 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहे. गेल्या काही दिवसापासून याची चांगलीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा रिव्ह्यू कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. आता सिनेमाचे सेन्सॉर प्रमाणपत्र आणि कट्सबद्दल काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिव्ह्यू कमिटीने खिलाडी याचा हा सिनेमा बघितला आहे. या सिनेमाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळायला पाहिजे, या निष्कर्षापर्यंत कमिटीने आढावा घेतला आहे. एवढेच नाही तर, सिनेमा बघितल्यानंतर समितीने सिनेमात २० कट्स करण्यास सांगितले असल्याचे देखील सांगितले जात आहे.

परंतु आतापर्यंत सीबीएफसीने या कट्सविषयी निर्मात्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस जारी केली नाही. यामध्ये या कट्सचे कारण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खिलाडीचा हा सिनेमा ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसापासून निर्मात्यांनी सिनेमातील एक गाणे देखील रिलीज करण्यात येणार होते. सिनेमातील हे गाणे चाहत्यांना चांगलेच आवडल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु आता सेन्सॉरकडून कट्सची विचारणा झाल्यामूळे अशा स्थितीत खिलाडीच्या सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलली जाणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

खिलाडीने‘ओएमजी’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. मात्र, ‘ओएमजी २’मध्ये तो भोलेनाथच्या भूमिकेमध्ये दिसला आहे. त्याच्या लूकची झलक टीझर आणि गाण्यात बघायला मिळाली आहे. अमित राय दिग्दर्शित ‘OMG 2’ हा सिनेमा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘OMG’ सिनेमाचा सिक्वेल असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी सिनेमा गृहामध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *