राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा घणाघात…

मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्या करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. एवढचं नाहीतर आता शिवसेना पक्षासारखीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुनच आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘खास रे टिव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत रोखठोकपणे आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात आणि भाजप मजा बघत असल्याचा घणाघात संभाजीराजेंनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह सत्तेत जाण्याच निर्णय घेतला. त्यावरुन राज्यात मोठा भूकंपच झाल्याचं बोललं गेलं. त्यानंतर आता हे 9 मंत्री आठ नऊ महिन्यांसाठी सत्तेत जाऊन असा कोणता विकास करणार असल्याचा संतप्त सवालही संभाजीराजेंनी केला आहे.

2019 साली शिवसेना भाजपची नैसर्गिक युती तुटली. त्यानंतर पहाटेचा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्यानंतर महाविकास आघाडीचा जन्म झाला. अडीच वर्षानंतर एक गट फुटला त्यापाठोपाठ आता दुसऱ्याही पक्षातला गट फुटला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकीकडे परखडपणे पुरोगामी फुले-शाहु-आंबेडकरांचे विचार सांगतात अन् दुसरीकडे सत्तेत सामिल होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

एकंदरीत सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय चिखलफेक सुरु असून ही राजकीय परिस्थिती पाहुन वाईट वाटतयं, खर तरं ही लोकशाहीची थट्टा असून हे महाराष्ट्राचे संस्कार नसल्याचं परखड मत संभाजीराजे छत्रपतींनी मांडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *