कुठं चाललीय महिला सुरक्षा? सरकारला टार्गेट करुन फक्त मणिपूरवर बोललं जातं; चित्रा वाघ संतापल्या

Chitra Wagh On Congress : मणिपूर प्रकरणाची चर्चा करायलाच हवी, त्याचसोबत मालद्याची आणि राजस्थानच्या प्रकरणाचीही चर्चा व्हावी, आपण काल पाहिलं की, बिहारमधला एका महिलेला त्रास देणारा एक व्हिडीओ पाहिला. तो पाहताना आपल्याला लक्षात येते की, कुठं चाललीय महिला सुरक्षा? त्यामुळे फक्त सरकारला टारगेट करुन मणिपूरवर बोललं जात आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करायला तयार असतानासुद्धा विरोधीपक्ष संसद चालू देत नाही. जेव्हापासून राहूल गांधी यांचं सदस्यत्व रद्द झालं तेव्हापासून फक्त गोंधळ घालणं हीच विरोधीपक्षाची भूमिका राहिल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, विरोधी पक्षातील लोक मीडियासमोर बोलत आहेत मात्र हाऊसमध्ये चर्चा व्हायला हवी, त्यासाठी विरोधक तयार नाहीत. राजस्थानमधील प्रकरणाबद्दल पाहिलं तर त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याने उभा राहून आपलं मत मांडलं, का त्याला काढून टाकलं? असाही सवाल केला.

जेव्हा चर्चा होईल तेव्हा मणिपूरवरही होईल, मालद्यावरही होईल, राजस्थानवरही होईल आणि बिहारवरही होईल असंही स्पष्टपणे सांगितलं. आपण पाहतोय की, मणिपूरमधील घटनेवर विरोधक बोलत आहेत मात्र त्याचवेळी विरोधक मालद्यावर बोलत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना त्यावर त्या बोलत नाहीत.

निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्टेजवर जाऊन महिलांवर अन्याय होतोय म्हणून अश्रू ढाळत होत्या. आता त्यांना महिलांवरील अन्याय दिसत नाही का? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. राहूल गांधी मणिपूरमध्ये गेले मात्र ते मालद्याला का गेले नाही? राजस्थानला का गेले नाही, बिहारला का गेले नाही? असाही सवाल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *