आमची कामेच होत नाहीत; 11 आमदारांचे CM सिद्धरामय्या यांना नाराजीचं पत्र, सरकार संकटात?

11 mla complaint : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार (Congress government in Karnataka) स्थापन होऊन अवघे दोनेक महिने झाले असतील, तोच आता कर्नाटक कॉंग्रेसमध्ये नाराजीच्या चर्चां सुरू झाल्या आहेत. नुकतचं राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूण 20 मंत्री आपले काम नीट करत नसल्यामुळे आमदारांनाही आपापल्या भागात काम करताना अडचणी येत असल्याचा दावा त्या पत्राद्वारे केला आहे. (11 mlas complaint in letter cm and dks says all is well)

पत्रात काय लिहिले आहे?
काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले असून ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले आहे.
गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी लिहिले की, ‘आम्ही लोकांच्या विश्वासानुसार, काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत. मंत्री लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाहीत आणि सहकार्य करत नसल्याने कामे पूर्ण करणार नाहीत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

जेव्हा आम्हाला प्रकल्पांसाठी निधीची चर्चा करायची असते. तेव्हा मंत्र्यांपर्यंत पोहोचणे कठीण होतं. त्यांना कामाची माहिती देण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधावा लागतो.अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आमच्या शिफारस पत्रांचा विचार केला जात नाही. कोणताही अधिकारी आमचे ऐकत नाही, असा तक्रारी या पत्रात आहेत.

NASA ; ‘नासा’ची 90 मिनिटं बत्ती गुल, कट्टर दुश्मन धावला मदतीला

दरम्यान, आलंडच्या आमदाराने कबूल केले की त्यांनी एक पत्र लिहिले आहे, परंतु “आमचे पत्र वेगळे होते,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी तपशील सांगण्यास नकार दिला. मात्र, बनावट पत्रावरून आपण पोलिसांत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिले?
सीएम सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या राज्य युनिटमध्ये असंतोष किंवा असंतोष असल्याच्या बातम्या आणि अफवांचे खंडन केले.
व्हायरल झालेल्या पत्रात एकही अधिकारी आमदारांचे ऐकत नसल्याचा आरोप होत आहे. आता या पत्राबाबत सीएम सिद्धरामय्या यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, याबाबत तुम्हाला कोणी सांगितले? असा प्रतिप्रश्न केला. तर
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही स्पष्ट केले की, आम्ही सर्व मंत्र्यांना सर्व आमदारांना सोबत घेण्यास सांगितले आहे, जे हरले त्यांच्याशी बोला. त्यांचीही कामे करा, असं सांगितलं. प्रत्येकजण आपापली कामे करत आहे. पत्रात जे लिहिलं, तसं काहीही नाही. या फक्त अफवा पसरवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *