‘Baipan Bhaari Deva’ ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई; पार करणार १०० कोटींचा टप्पा?

  • Baipan Bhaari Deva : * ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन २५ दिवस पूर्ण झाले आहेत. ( Box Office) आज देखील या सिनेमाची क्रेझ जोरदार असल्याचे दिसून येत आहे. जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर हा सिनेमा दिवसेंदिवस चांगलाच गल्ला कमवत असल्याचे दिसत आहे. एकीकडे ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) आणि ‘बार्बी’ सारखे हॉलिवूड सिनेमे धमाका करत असतानाच ‘बाईपण भारी देवा’देखील जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा ३० जून २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला.

मराठी सिनेप्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा सुपरहिट झाला आहे. (Director Kedar Shinde) मिळालेल्या माहितीनुसार, रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने (Baipan Bhari Deva Box Collection) १.५ कोटींचा गल्ला कमावला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये १२.४ कोटींचा गल्ला जमवला होता. दुसरा आठवडा २४.९५ कोटी आणि तिसरा आठवडा २१.२४ कोटींचा गल्ला कमावला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर २५ दिवसांत या सिनेमाने ६६.६१ कोटींचा गल्ला कमवले आहे.

‘बाईपण भारी देवा’ने रेकॉर्डब्रेक कमाई करण्याबरोबरच अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. लवकरच हा सिनेमा रितेश देशमुखच्या ‘वेड’ आणि नागराज मंजुळेच्या ‘सैराट’चा रेकॉर्ड ब्रेक मोडण्याची शक्यता आहे. अनेक चाहते पुन्हा- पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाच्या रिलीजअगोदर चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी मोठी उत्सुकता बघायला मिळली होती.

बॉक्सऑफिसवर हा सिनेमा कमाल करेल, अशी चर्चा देखील रंगली होती आणि आता याच अपेक्षेवर खरं उतरत या सिनेमाने फक्त २५ दिवसांत केलेली ६६.६१ कोटींचा गल्ला कमावला आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या कलेक्शनचं चित्र बघता या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिल्याचे दिसून येत आहे. नऊवारी साडी आणि गॉगल लावून अनेक बायका सिनेमा बघायला जात असल्याचे दिसून येत आहे. महिलांसह तरुण आणि पुरुषवर्ग देखील या सिनेमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे.

सर्व वयोगटातील महिलांना हा सिनेमा चांगलाच भावला असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सांभाळली आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या सिनेमात मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *