Udahav Thackery यांनी ‘तेव्हा’ मार्ग काढला असता, तर ही वेळ आलीच नसती; शिंदे गटाची टीका

Shambhuraj Desai On Udahav Thackery : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी बंडामागील कारणं सांगितली जात होती. त्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही असा देखील आरोप करण्यात आले. मात्र आता शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले. ते पुन्हा अर्थमंत्री देखील झाले. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांच्या अजित पवारांवर केलेल्या आरोपांचं काय होणार अशी चर्चा सुरू आहे. त्यावर आता शिंदेंचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर या प्रकरणावरून टीका केली आहे. (Shambhuraj Desai Criticise Udahav Thackery on when Ajit Pawar was Finance Minister in MVA )

काय म्हणाले शंभूराज देसाई?

शंभूराज देसाई म्हणाले, ‘अर्थसंकल्पानंतर दोन वेळा पुरवणी मागण्या मांडण्यात येतात. ज्या कामांना निधीची गरज आहे. ते यामध्ये मांडसले जातात. पुरवणी मागण्या जयंत पाटील यांच्या मतदारसंघालाही यावेळी निधी देण्यात आला. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या सरकरमध्ये आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव केला जात नाही. हे स्पष्ट झालं आहे.’

तसेच मविआमध्ये असातना अजित पवारांची भूमिका वेगळी होती आता ती बदलली आहे. तेव्हा ते भाजप आणि मोदींचा विरोध करायचे. मात्र आता ते देशाला मोदींची गरज असल्याचं म्हणत आहेत. तर जेव्हा मविआमध्ये आम्ही शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार कमी निधी देतात हे उद्धव ठाकरेंना सांगायचो तेव्हा ठाकरेंनी त्यावर मार्ग काढण्याची गरज होती. ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे ही वेळ आली अशी टीका शिंदेंचे आमदार शंभूराज देसाईंनी केली. पुढे शंभूराज देसाईंनी असं देखील म्हटलं की, उद्धव ठाकरे आमच्या समस्यांवर मार्ग काडडत नव्हते मात्र एकनाथ शिंदे आमच्यासाठी भूमिका घेतात.

दरम्यान अर्थ खातं पुन्हा हाती येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदेच्या आमदारांना तात्काळ मतदारसंघातील विकासकामांसाठी 25 कोटीहून अधिक निधी मंजूर केला आहे. त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर शिंदेंच्या आमदारांचा निधी न देण्याचा आरोप पवारांनी पुसण्याची प्रयत्न मात्र केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *