‘Kaun Banega Crorepati 15’ मध्ये मोठा बदल होणार; बिग बींनी केलं जाहीर, पाहा नवा प्रोमो

  • Kaun Banega Crorepati* : बॉलिवूडचे महानायक बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी होस्ट केलेला ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) हा लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सीझन चाहत्यांनी नेहमी हिट ठरला आहे. आता या कार्यक्रमाचा १५ वा सीझन चाहत्यांच्या पुन्हा भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

नुकताच ‘कौन बनेगा करोडपती-१५’चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. प्रोमो बघितल्यावर चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, ‘कौन बनेगा करोडपती-१५’ मध्ये काहीतरी रंजक पाहायला मिळणार आहे. KBC १५’ चा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. या प्रमोमध्ये बिग बी हे,“बदल रहा है, देखो सब कुछ बदल रहा है” असे म्हणत असल्याचे दिसून येत आहेत.

या प्रोमोमध्ये बिग बी हे सोशल मीडिय, कंटेन्ट क्रिएटर आणि लहान व्यवसायांच्या यशाबद्दल बोलत असल्याचे दिसत आहेत. आज लोक त्यांच्या मोबाईल फोनच्या एका क्लिकवर अनेक प्रकारचे पदार्थ ऑर्डर करत असतात. अनेक टेक्नोलॉजीमुळे कुटुंबं कशा पद्धतीने एकत्र येत असतात, हे ‘KBC १५’ च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रोमोच्या शेवटच्या काही मिनिटात बिग बी म्हणतात की, जेव्हा एखादा देश बदलत असतो आणि विकसित होत असतो. तेव्हा ते प्रगती पदावर जाण्याचे मार्ग असतात. हा प्रोमो बघितल्यानंतर चाहते असा अंदाज लावत असल्याचे दिसून येत असतात.

केबीसीच्या या सीझनमध्ये काही वेगळे ट्वीस्ट असल्याचे पाहायला मिळणार आहे.  परंतु या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या ट्वीस्टबद्दल कोणतीही घोषणा केली नसल्याचे दिसून येत आहे. ‘कौन बनेगा करोडपती १५’ या शोसाठी नोंदणी एप्रिलमध्ये सुरू झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा शो चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

बिग बी २ हजारामध्ये पहिल्या सीझनपासून हा शो होस्ट करत असल्याचे दिसून येत आहेत. फक्त तिसरा सीझन अभिनेता किंग खानने होस्ट केला होता.  अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याचे दिसून येत असतात. तसेच केबीसीच्या या कार्यक्रमाबरोबर बिग बी हे अनेक सिनेमामधून देखील चाहत्यांच्या कायम भेटीला येत असतात. गेल्या काही दिवसाअगोदर त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे सिनेमा प्रदर्शित झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *