ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर यांनी पोस्ट करत म्हणाले…

Dr. * Mohan Agashe Punyabhushan Award* : नुकताच पुण्यामध्ये ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे प्रत्येक वर्षी हा मानाचा पुरस्कार देण्यात येत असतो. यंदाचा हा पुरस्कार आपल्या हटके अभिनयाने फक्त मराठीच नव्हे तर हिंदी नाट्य-सिनेमामध्ये आपल्या कलेचा दबदबा निर्माण करणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानित करण्यात आला आहे.

याबद्दल बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher)  आणि अभिनेत्री श्रमिला टागोर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ‘पुण्यभूषण’ पुरस्कार स्वीकारल्यावर ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी म्हणाले आहे की, ‘पुण्यात आज माझा हा सन्मान होत आहे याचे मला खुप आनंद आहे. या पुणे शहराने मला खूप काही दिल आहे, तसेच या शहराने मला खूप सांभाळून घेतल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हा पुण्यभूषण पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे. मी म्हणेन की यासाठी मी एकट्याने काही देखील केले नाही, जे काही केले ते माझ्याबरोबर अनेकांनी एकत्र येऊन केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे हा पुरस्कार माझ्या एकट्यासाठी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझ्या वैद्यकीय पेशाने मला एक वेगळा विचार करायला शिकवल्याचे ते म्हणत होते. परंतु मला अभिनय क्षेत्राने माणूस म्हणून जगायला शिकवले आहे. आयुष्यात समतोल राखण्यासाठी याची मला खूप मदत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच यावेळी अनुपम खेर यांनी देखील डॉ. मोहन आगाशे यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. डॉ. मोहन आगाशे यांच्या कारकीर्दीच कौतुक करत असताना अनुपम खेर यांनी म्हणाले आहे की, ‘आजघडीला या ओटीटी विश्वामध्ये लोकप्रिय होणं खूप सोपं झाले आहे. परंतु कलाकार म्हणून आदर मिळवणं खूप अवघड असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या दमदार अभिनयाने तो आदर कमावला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा घाशीराम कोतवाल हे नाटक बघितलं होत, तेव्हापासून ते आजपर्यंत मी त्यांचा चाहता झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *