Manipur Violence : आणखी दोन तरुणींवर अत्याचार, जमावाकडून निर्घृण हत्या…

जळणारं मणिपूर अद्यापही शांत व्हायचं नाव घेत नाही. नूकत्याच दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरातलं वातावरण ढवळून निघलेलं असतानाच आता आणखी एक धक्कादाय प्रकार समोर आल आहे. दोन कुकी समाजाच्या तरुणींवर जमावाने बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप पीडित तरुणींच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

विशेष म्हणजे ही घटना ही घटना इम्फाळामधील कोनुं मामांग इथं घडली आहे. ज्या ठिकाणी विवस्त्र महिलांची धिंड काढण्यात आली त्या ठिकाणापासून 40 किमी अंतरावर आहे. त्यामुळे आता कुकी समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीनूसार, काही महिलांनीच पीडित दोन तरुणींना एका खोलीत घेऊन गेले होते. त्यानंतर पुरुषांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी पाठबळ दिले. जवळपास तब्बल दीड तास पीडित तरुणींवर अत्याचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ओढत बाहेर काढण्यात आले आणि फेकून दिल्याचं साक्षीदाराने सांगितलं आहे. 200 जणांच्या जमावाकडून हे अत्याचाराचे कृत्य करण्यात आल आहे.

दरम्यान, ही घटना घडली त्यानंतर सुरुवातीला पीडित तरुणीचे कुटुंबिय कलंक लागू नये म्हणून पीडितांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. मात्र, एका मुलीच्या आईने याबाबत 16 मे रोजी सायकूल पोलिसांत गुन्हा दाखल केलेला आहे.

अत्याचार केल्यानंतर तरुणींची हत्या केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. त्यानंतर हे प्रकरण इम्फाळ जिल्ह्यातील पोरोम्पत पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आलं. अजूनही या तरुणींचे मृतदेह सापडलेले नाहीत, या प्रकरणी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *