‘अफलातून’ची दुसऱ्या दिवशीही जोरदार कमाई, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Aflatoon film box office colletion : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमी आपल्या विनोदी स्टाइलमधून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर सिद्धार्थचा ‘अफलातून’ (Aflatoon) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अफलातून चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई केली, याचा आकडा समोर आला. (Marathi film Aflatoon box office colletion)

तीन जिवलग गुप्तहेर मित्रांची मजेशीर धमाल असलेल्या ‘अफलातून’ या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटाला सर्वच स्तरातील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही (शनिवार 22 जुलै 2023) अपेक्षेप्रमाणे चांगली कमाई केली. काल या चित्रपटाने 2.03 कोटींची गल्ला जमवला तर काल पहिल्याच दिवशी या चित्रटाने 0.95 कोटींचा कमाई केली होती. आठवड्या अखेर हा चित्रपट ५ कोटींपर्यंत कमाई करण्याची शक्यता आहे.

Manipur Violence : आणखी दोन तरुणींवर अत्याचार, जमावाकडून निर्घृण हत्या…

अफलातून (मराठी) ऑल इंडिया नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन-
मुंबई – रु. 1.10 कोटी, C.P- रु. 63.59 लाख आणि मराठवाडा – रु. 29.83 लाख. चित्रपटाने 2.03 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, जॉनी लिवर, जेसी लिवर, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, तेजस्विनी लोणारी, विजय भटकर, भरत दाभोळकर, रेशम टिपणीस यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन परितोष पेंटर यांनी केले आहे. हा चित्रपट 21 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *