CM शिंदेंनी सहकुटूंब घेतली PM मोदींची भेट, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं भेटीचं नेमकं कारण

CM Shinde met PM Modi मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील, ते स्वत:, श्रीकांत शिंदे आणि नातू यांच्यासह पत्नी आणि सुन यांनी मोदींची भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रिमंडळावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, या भेटीसंदर्भात आता खुद्द सीएम शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ही कौटूंबिक भेट होती. पीएम मोदींनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिला आणि बऱ्याच गप्पा मारल्या, या भेटीत राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (Chief Minister Shinde met Prime Minister Narendra Modi with his family)

सीएम शिंदे यांनी आज सकाळी ११ वाजता पीएम मोदींची सहकुटूंब घेतली. जवळपास एक तास ही भेट चालली. पीएम मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आज मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. ही भेट खूप चांगल्या पद्धतीने झाली. पंतप्रधान मोदींनी आम्हाला भरपूर वेळ दिला. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. या दरम्यान, राज्यात काय चाललंय? याबाबत आम्ही चर्चाही केली. आम्ही पाऊस आणि इर्शालगड दुर्घटनेवरही चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगिलतं.

शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावी प्रकल्पाचा उल्लेख केला. हा प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास लोकांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुनर्विकास प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड या संदर्भात चर्जा झाली. या भेटीत जनतेच्या हिताला केंद्र सरकार पाठिंबा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी दिल्याची माहिती सीएम शिंदेंनी दिली.

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा बॉसी लूक

ते म्हणाले, माझ्या कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायची इच्छा होती, त्यामुळं आम्ही त्यांचा वेळ घेतला. मोदीजींना माझ्या वडिलांशीही गप्पा मारल्या. तसंच त्यांनी माझ्या नातवालाही काही प्रश्न विचारले आणि नातवाशीही बोलले, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आठवडाभरातील हा दुसरा दिल्ली दौरा आहे. एनडीएच्या बैठकीनंतर तीन दिवसांनी एकनाथ शिंदे पुन्हा पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी आज दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *