Box office collection: ‘ओपनहायमर’ने रचला नवा इतिहास; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी!

  • Oppenheimer Box office collection* : सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या सिनेमाची चांगलीच चर्चा होत असते. तसेच त्याच्या सिनेमाची क्रेझ आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. देशात गेल्या काही दिवसापासून या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर ( J Robert Oppenheimer) यांच्या जीवनावर हा सिनेमा काढण्यात आलेला आहे.

देशात या सिनेमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार  ‘ओपनहायमर’ने पहिल्याच दिवशी १३ ते १४ कोटींचा गल्ला कमावल्याचे दिसून आले आहे. ‘ओपनहायमर’सोबत हॉलिवूडचा ‘बार्बी’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. परंतु त्यापेक्षा सर्वात जास्त उत्सुकता ही ख्रिस्तोफर नोलनच्या सिनेमाची पाहायला मिळाली आहे.

नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘मिशन इम्पोसीबल ७’ आणि ‘फास्ट एक्स’ या दोन्ही सिनेमानं सहज मागे टाकत ‘ओपनहायमर’ देशात  पहिल्याच दिवशी सर्वाधिक गल्ला कमावणारा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. ‘मिशन इम्पोसीबल ७’ने पहिल्याच दिवशी १२.५० कोटी कमावले होते. यामुळे नोलनच्या या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. ‘ओपनहायमर’ या सिनेमाला काश्मीरमध्ये सुरू झालेल्या एकमेव सिनेमागृहात उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे बघायला मिळाले आहे.

चाहत्यांनी या सिनेमाचं प्रचंड प्रमाणात कौतुक करत असल्याचे दिसून येत आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता. त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते. सिनेमात देखील या गोष्टीचा उल्लेख दोन ठिकाणी करण्यात आला आहे. नोलनच्या या बहुचर्चित सिनेमात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केल्याचे दिसून आले आहे. यासोबत रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *