… तर आम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवावी लागेल; शिंदेंच्या आमदाराचं मोठं वक्तव्य

Shinde Group Kishor Patil : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह निवडणुक आयोगाने शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला दिले आहे. मात्र तरी देखील काही तांत्रिक अडचण आली. तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या (कमळ ) या चिन्हावर निवडणुक लढवू. असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं. ते एका वृत्तवाहिनीशी मुलाखती दरम्यान बोलत होते. (Shinde Group Kishor Patil if issue there will we Faught on BJP Election Symbol )

काय म्हणाले आमदार किशोर पाटील?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पक्षामध्ये 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या दरम्यान शिवसेनेमध्ये ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलं. त्या लढाईमध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह निवडणुक आयोगाने शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला दिले आहे. मात्र अद्याप या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होणं बाकी आहे.

त्यामुळे मूळ शिवसेना आणि पक्ष चिन्ह कुणाचं आहे. याबाबत संभ्रम कायम आहे. 99.99 तर निर्णय आमच्याच बाजूने लागेल. पण तरी देखील काही तांत्रिक अडचण आली. तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या (कमळ ) या चिन्हावर निवडणुक लढवू. असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं. ते एका वृत्तवाहिनीशी मुलाखती दरम्यान बोलत होते.

तसेच ते पुढे म्हणाले की, याते सर्व निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील. ते आम्हाला जसं सागंतील तसंच सगळं होईल. त्यांनी जर सांगितल की, आम्हाला अपक्ष निवडणुक लढवायची आहे. तर आम्ही अपक्ष निवडणुक लढवू. तसेच ते जरम म्हणाले, तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या (कमळ ) या चिन्हावर निवडणुक लढवू. असं म्हणत त्यांनी एक सूचक इशारा दिला आहे.